पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील सनराईज पब्लिक प्रशालेचे संस्थापक सचिव सुप्रसिद्ध युवा ग्रामिण साहित्यिक अंकुश गाजरे यांना या वर्षीचा आदर्श शिक्षक/लेखक पुरस्कार नुकताच अतिशय दिमाखदार सोहळ्यात सन्मानाने देण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध मान्यवर मा.आमदार दिलीपराव सोनवणे,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन अभिजित पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,माजी जिल्हापरिषद सदस्या जयमाला ताई गायकवाड,युवा उद्योजक आमचे स्नेही नागेश दादा फाटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयसिंह जगताप ई मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..!!
सनराईज व तेज न्यूज परिवाराच्या वतीने अंकुश गाजरे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.