शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्यासाठी सदैव पाठीशी मा.आमदार प्रशांत परिचारक
कै.पुष्पा आणि कै.नारायण दुधाणे स्मृती संगीत सेवा सन्मान पुरस्कार दिलीप टोमके यांना प्रदान
पंढरपूर प्रतिनिधी
अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब आणि मनमाडकर परिवार यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या पद्मश्री जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सुरुवात दिमाखात झाली.सुरुवातीला मा.आमदार प्रशांतमालक परिचारक, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,सौ.रश्मी अभिषेकी,पं.वसंतराव मराठे,पं.हेमंत पेंडसे, अभेद अभिषेकी,भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर दिलीप टोमके, डॉ.प्रसाद कुलकर्णी,आणि संयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या शुभहस्ते पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविक आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.त्यानंतर कै.पुष्पा व नारायण पंढरीनाथ दुधाणे स्मृती संगीत सेवा सन्मान पुरस्कार पंढरपूर मधील गायक दिलीप टोमके यांना मा.आमदार प्रशांतमालक परिचारक ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की पंढरपूर नगरीला परंपरागत सांस्कृतिक वारसा लाभला आहे.आणि तो वारसा जपण्यासाठी स्वरसाधनेच्या माध्यमातून सुरू झालेली परंपरा आता पंढरपूर नगरीत पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने ही परंपरा सुरू होत आहे याचा आनंद वाटतो.आणि भविष्यकाळात हा संगीत महोत्सव नक्कीच पंढरपूरकर कलारसिकांना वरदान ठरेल.यासाठी आम्हीं ही सदैव पाठीशी उभे राहू.असे सांगितले.यानंतर ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,दिलीप टोमके यांनी मनोगत व्यक्त केले, आणि आज भगवान भाऊ मनमाडकर यांचा योगायोगाने वाढदिवस होता.त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर कल्याणी जोशी यांच्या गायनाला सुरुवात झाली.त्यांनी राग श्री. विलंबीत तिलवडा तालातमध्ये तसेच राग शंकरा सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.द्वितीय सत्रात पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं.हेमंत पेंडसे यांच्या गायनाला सुरुवात झाली.त्यांनी राग दरबारी कानडा अतिशय सुंदर सादर करत अभिषेकी बुवांची दमदार गायकीची आठवण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर अबीर गुलाल उधळीत रंग,संतभार पंढरीत आणि स्वरचित दोन सुंदर भावपूर्ण रचना गाऊन भैरवीने पहिल्या दिवसाची सांगता केली.दोन्ही कलाकारांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला अभिजित बारटक्के हार्मोनियम सुरेश फडतरे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ वैभव केंगार यांनी केली.कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन माधूरी जोशी यांनी केले.आभार निता कुलकर्णी यांनी मानले.भारत गदगे यांनी कलाकारांची स्केच काढून भेट दिल्या.
या संगीत महोत्सवाला पंढरपूर व पंचक्रोशीतील कलासाधक आणि कलाप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी तरंगिणी घ्या रश्मी अभिषेकी,भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगीताई मनमाडकर,धनंजय मनमाडकर,देवकी दुधाणे ,डॉ.प्रसाद कुलकर्णी, डॉ.मिलिंद जोशी, स्वानंदी काणे,राजेश खिस्ते,वैभव केंगार, राम अनवते,संगीत भिसी मंडळाच्या सदस्यांनी आदी जण अथक परिश्रम घेत आहेत.आज अभेद अभिषेकी यांचे गायन उसंतआणि आणि शिखरनाद कुरेशी यांचे जेंबेवादन होणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.