निंबध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संकेत ढवळे यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर निंबध लेखन केले आहे. लहान मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून संकेत ढवळे यांनी राबविलेला उपक्रम कौतुकस्पद आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या निंबध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी उपनगराध्यक्ष गणेश अधटराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, पंढरपूर कार्याध्यक्ष शुकुर बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य, जिल्हा तसेच तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ या स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश संकेत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 2 मार्च रोजी दुर्गा प्रशाला इसबावी पंढरपूर येथे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश शिंदे, सुनील जाधव, योगेश जाधव, विजय काळे, शाळेचे संस्थापक डॉ संतोष दोशी, सचिव मलपे, दत्तात्रय माने, गजानन ननवरे, वरद ननवरे, बंटी घोगरदरे, अजित खिलारे, शुभम शिरकर, शुभम पवार, गणेश झेंड आदींनी परिश्रम घेतले.