४२ - सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस, इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई सुशिलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाव भेट दौरा सुरू केला.
अन्यायी सरकारला तडीपार करण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांना अक्कलकोट तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार :- माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे
सोलापूर प्रतिनिधी
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..."
या शब्दात एवढी ताकद आहे की, कोणतेही आव्हान ऊचलण्यासाठी एक प्रकारची ताकद यामुळे मिळते.नक्कीच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोटसह सोलापुर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल.
यावेळी सोबत माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, युवा नेत्या शितलताई म्हेत्रे, युवा नेते प्रथमेश म्हेत्रे, मनोज यलगुलवार यांच्यासह इतर मान्यवर सोबत होते.