भाळवणी प्रतिनिधी
दि.२७/०३/२०२४ रोजी पंढरपुर विभागातील,पंढरपुर ग्रामीण १ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या शाखा कार्यालय भाळवणी मधील घरगुती,व्यावसायिक,औद्योगीक व इतर प्रवर्ग वीज ग्राहकांची ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या चालु देयकासह थकबाकी शुन्य झाली आहे.
या कामी पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील ,पंढरपूर ग्रामीण १ उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाखा कार्यालयाची थकबाकी शुन्य करणेच्या दृष्टीने केलेल्या नियोजनाप्रमाणे शाखा कार्यालय भाळवणी मधील सर्वच जनमित्र तसेच यंत्रचालक या सर्वांनी मिळुन एकजुटीने काम करुन हे उद्दीष्ट साध्य केले,त्याबद्दल सर्वांचे मनापासुन हार्दीक अभिनंदन केले.
तसेच शाखा कार्यालय भाळवणी अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांचे विशेष आभार व धन्यवाद !!! ज्यांनी देय दिनांक मार्च महिण्याच्या अखेरीस असतानाही जनमित्रांच्या शब्दाला मान देऊन देय दिनांकाच्या अगोदरच चालु महिण्याची वीज देयके भरुन महावितरण कंपनीस सहकार्य केले.
यावेळी शाखाधिकारी चांदणे यांनी सर्वांचे मनापासुन आभार मानून सर्वांना धन्यवाद व्यक्त केला.