मोहोळ प्रतिनिधी
सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम भाई सातपुते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
त्यावेळेस आ.राम सातपुते यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य चरण राज चवरे, सोलापूर भाजपा मोहोळ विधानसभा प्रचार प्रमुख रमेश माने, बाळू अण्णा गवळी,महादेव चव्हाण, दत्तात्रय गावडे, दिलीप चवरे बंडू सलगर तानाजी पुजारी अक्षय चवरे , लक्ष्मण नाना चवरे, विलास सलगर, धनाजी खरात, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसेना भाजपा युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.