पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील प्रसिद्ध वृत्तपत्रलेखक, कथाकथनकार, साहित्यिक, नाट्यकर्मी, खेळाडू व आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिकातून पंढरपूरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण सर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले, त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र शाल,हार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून या पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरावरून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी आजपर्यंत प्रकाशित झालेल्या एका साहित्यकृतीबरोबर (पुस्तक) साहित्यिकाने आपले परिचय पत्र पाठविणे आवश्यक आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी परिचय पत्र व कार्याचा आढावा पाठविणे आवश्यक आहे. स्व.श्री.आप्पासाहेब चव्हाण सामाजिक व सांस्कृतिक
या प्रतिष्ठानच्यावतीने येत्या 4 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार दिले जाणार आहेत, तरी सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींनी आपले प्रस्ताव श्री.अमरसिंह आप्पासाहेब चव्हाण, वैष्णव सदन, लक्ष्मी नगर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौकाजवळ, पंढरपूर या पत्त्यावर २० एप्रिलपूर्वी पाठवावेत. अधिक माहितीसाठी श्री.रविराज सोनार - ९९२२५१४३००, डॉ.श्री.सचिन लादे - ७५८८२१६५२६ व श्री.मंदार केसकर - ९४२२३८०१४६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.अमरसिंह चव्हाण, श्री.अमोल चव्हाण व श्री प्रताप चव्हाण यांनी केले आहे.