भाळवणी प्रतिनिधी
भाळवणीतील सोसायटी नं १ व 2,प्रगती महिला बचत गट या रेशन दुकानात अंत्योदय रेशन कार्ड योजनेतील लाभार्थ्यांना मार्च महिन्यातील रेगुलर मोफतचा माल व मोफत साडी वाटप सुरू करण्यात आले आहे.आज शनिवार दिनांक 16/3/2024 रोजी सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत एकच दिवस सुरू राहणार आहे.
उद्या फक्त अन्न सुरक्षा योजनेचा रेशन कार्ड धारकांना माल वाटप केले जाणार आहे. साडी फक्त अंत्योदय कार्ड धारकांना मिळणार आहे.अंत्योदय चे वाटप एकच दिवस आहे तरी सर्वांनी आपले धान्य व साडी घेऊन जाने संपर्क नंबर 9834241446, 9860078390 आहे.
तरी सर्व पात्र रेशन कार्ड धारकांनी आपला माल व साडी रेशन दुकानातून तात्काळ घेऊन जाणे.असे रेशन दुकानदार धोंडीराम शिंदे यांनी सांगितले आहे.