पंढरपूर प्रतिनिधी
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. त्यामध्ये श्रीं.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-याचे संवर्धन आषाढी यात्रा 2024 पूर्वी करण्याचे प्रस्तावित आहे. तथापि, गाभा-यातील संवर्धनाचे काम करताना मुर्तीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने श्रीच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबत दिनांक 12 मार्च, 2024 रोजी बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार आज सकाळी 11.00 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चांदी काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह भ प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड.माधवी निगडे, सल्लागार परिषदेचे श्री अनिल अत्रे, कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके, सहायक नियंत्रक वैध मापन शास्त्र सोलापूर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मा.आ.समाधान आवताडे यांचेकडील प्रतिनिधी श्री पांडूरंग वाडेकर, वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे विष्णू कबीर महाराज, पत्रकार प्रतिनिधी सुनिल उंबरे, मंदार लोहकरे,अभिराज उबाळे, राजाभाऊ शहापूरकर व पत्रकार तसेच मंदिर समितीचे खातेप्रमुख उपस्थित होते.