पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर पंचायत समितीतर्फे दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरातमाळी वस्तीच्या शिक्षिका श्रीमती सविता प्रताप म्हेत्रे यांना पंचायत समिती पंढरपूरचे माजी सभापती वसंतनाना देशमुख, गटविकास अधिकारी अनंतराव मिरगणे, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे यांच्या हस्ते देण्यात आला.
यापूर्वी सविता म्हेत्रे यांना शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षक संघटनेचा आदर्श शिक्षका पुरस्कार, पी. टी. एस. परीक्षेचा जिल्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार, राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार व स्वर्गीयआमदार भारत नाना भालके फाउंडेशनचा कर्तृत्वान महिला पुरस्कार आदी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. गुरुवार दि.14 मार्च रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी पॅलेस कराड रोड येथे पंढरपूर पंचायत समितीतर्फे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. यावेळी सविता म्हेत्रे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी त्यांच्या मातोश्री सिंधु म्हेत्रे व बहिण अनिता लंगोटे तसेच शिक्षक नेते बाळासाहेब काळे, ज्योतीराम बोंगे, केंद्रप्रमुख ल. पा. कांबळे, मारुती क्षिरसागर, राणी लेंगरे, उत्तम जमदाडे, दादाराजे देशमुख, तानाजी शिंदे, सुनील कोरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सदरचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.