भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील मशीद जवळ अबैद्य मांस विक्री करताना एका महिलेला अटक करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस ठाणे गु.र.नं व कलम पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं.78/ 2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (क), 9(अ)प्रमाणे लावण्यात आले आहे.
पोकॉ/664 गणेश जगन्नाथ पाटील नेमनुक पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरोपीचे नाव व पत्ता असा आहे .शबाना गुलाम हुसेन कुरेशी वय 47 वर्षे रा. आझाद चौक अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर गु. घ. ता. वेळ. ठिकाण:- दि. 10/03/2024 रोजी दुपारी 2 वा चे सुमारास भाळवणी गावचे हददीतील मज्जीदीच्या पाठीमागे मांस विक्री करताना महिला आढलून आली.गुन्हा दाखल सदर्च गुन्हा दि.10/03/2024 रोजी 1 वा 30 मिनिटांनी घडलं.या घटनेचे ठिकाण, दिशा व अंतर पश्चिमेस 22 किमी अंतरावर आहे.यावेळी मिळालेला माल 2700/- रू. किंमतीचे एकूण 18 किलो जनावराचे मांसाचे तुकडे , मांस व जनावराचे पायाचे काळ्या रंगाचे दोन खूर. एक धारदार चाकू मांसाचे तुकडे करण्यासाठी वापरत असलेला जु. वा. किं.अं. जप्त करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की दिनांक 10/03/2024 रोजी दुपारी 2 वा चे सुमारास मौजे भाळवणी गावचे हददीत मज्जीदीच्या पाठीमागे महिला शबाना गुलाम हुसेन कुरेशी वय 47 वर्षे रा. आझाद चौक अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर हिने मांस विक्रीचा कोणताही पासपरवाना न घेता व सदर मांस हे खाण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबतचा पशुवैदयकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र न घेता लोकवस्तीमध्ये जनावरांचे मांस बाळगुन त्याची विक्री करीत असताना मिळुन आली आहे. याबाबत अंमलदार स.पो.फौ. जगताप हे आधिक तपास करीत आहेत.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले , पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एसआय शिंदे ,दिवसे, संतोष जगताप ,ए एस आय पोलीस नाईक गणेश रवींद्र बाबर यांनी केलेली आहे.