सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अमोल कुलकर्णी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचे मैदान,बसथांबा असणारे सोलापूर मधील मोक्याचे ठिकाण हे आसारा मैदान नामकरण करून टाकले गेले होते.त्याच जागेत सावरकर पुण्यतिथी निमित्ताने फलक लावून ते वीर सावरकर मैदान नाव पुन्हा चालू करण्यासाठी ब्राह्मण महासंघाने आग्रही भूमिका घेतली आहे.
दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शिवस्मारक येथे मेळावा घेऊन ब्राह्मण महासंघचे पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल कुलकर्णी,जिल्हा सरचिटणीस पदी अमोल कुलकर्णी {खर्डीकर)शहराध्यक्ष व्यंकटेश देशपांडे, प्रांजली हिंगे,कीर्ती देशपांडे, वकील आघाडी साठी माधुरी देशपांडे,जिल्हा युवक आघाडीसाठी अमृता बडवे,यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी बार्शी पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आंनद दवे,चैतन्य जोशी,आदि सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उद्योग,व्यापार,पतसंस्था कार्याचा आढावा प्रदेश अध्यक्ष प्रवीण शिरसिकर यांनी घेतला.
सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील ब्राह्मण समाजाचे जेष्ठ मंडळी उपस्थित होते.यावेळी श्रद्धा अध्यापक,प्रेमलता वैद्य,दिनकर सापनाईकर ,परिणीता कुलकर्णी, आरती फडके,उर्मिला जहागीरदार पौर्णिमा कुलकर्णी सर्वांवर विविध जबाबदारी देण्यात आली. मनोगते झाली.संघाचे कार्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती देशपांडे यांनी केले तर आभार मधुरा वडापुरकर यांनी मानले.