भाळवणी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय तर्फ घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स चे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत घवघवीत यश मिळविले.एलिमेंट्री ग्रेड परीक्षाचा निकाल 100% लागला आहे.यामध्ये ए ग्रेड प्राप्त 23 विद्यार्थी व बी ग्रेड प्राप्त 35 विद्यार्थी आहेत.
तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा निकाल 100% लागला असून ए ग्रेड प्राप्त 27 विद्यार्थी व बी ग्रेड प्राप्त 13 विद्यार्थी आहेत.या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक डी.एल. गोंजारी व टी.एस.खरात यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे स्कूल कमिटी चेअरमन संभाजी शिंदे, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक संघाचे सर्व सदस्य, सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ,विद्यालयाचे पर्यवेक्षक रोकडे एस.डी रोकडे व प्राचार्य एन.एम. गायकवाड यांनी अभिनंदन केले.