वकिलानी शिवनीतीचा अभ्यास व अवलोकन करणे गरजेचे. मान्यवर वकिलांचे मत.
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर वकील संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दीप प्रज्वोलन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची महारती देखील करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड . सुरेश गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले, याशिवाय वकिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार अंगिकारून संविधान व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले त्यानंतर वकील संघाचे सदस्य ॲड. शरद पाटील, ॲड. बापूसाहेब देशमुख ॲड .एस.व्ही.उजळंबे ॲड व्ही.एस.आळंगे ॲड .विजय मराठे, ॲड .एस आर पाटील व ॲड .मिलिंद थोबडे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलू वरती दृष्टीक्षेप टाकला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सर्वांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते, याशिवाय डिफेन्स लॉयर्सच्या प्रमुख पदी ॲड .रामदास वागज यांची सिंधुदुर्ग येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन बारचे पदाधिकारी उपाध्यक्ष असिम बांगी सचिव करण भोसले खजिनदार अविनाश काळे सहसचिव अनिता रणशृंगारे यांनी केले.
यासाठी ॲड.संतोष पाटील ॲड लक्ष्मण पाटील ॲड.संतोष बाराचारे ॲड.विक्रम काठुळे ॲड.महेश जगताप ॲड .दादासाहेब जाधव ॲड .प्रसन्न काशीद ॲड व्ही.पी शिंदे आदींनी परिश्रम घेतले. त्यावेळी ज्युनिअर व सिनियर वकिलांची मोठी उपस्थिती होती. सुत्रसंचलन करण भोसले यांनी केले तर आभार अनिता रणशृंगारे यांनी मानले.