सोलापूर प्रतिनिधी
उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा हा संकल्प घेऊन सोलापूर येथील फडकुले सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विविध व्यक्ती चा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शाल व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम चे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू यांनी केले होते.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्यामुळे पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार यांचा फेटा बांधून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व सन्मान पत्र देऊन राष्ट्रवादी कॉग्रेस चे सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष (भाऊ ) पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जुबेर बागवान अनिल बनसोडे दैनिक शिवनिर्णय चे पत्रकार वैजिनाथ बिराजदार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.