सोलापूर प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी अर्थात जुळे सोलापूर व श्री चौडेश्वरी (देवांग कोष्टी) समाजसेवी न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि लायन्स ने नेत्रालय यांच्या सहकार्याने श्री चौडेश्वरी देवस्थान महालक्ष्मी नगर विजापूर रोड सोलापूर येथे शिवजयंती चे औचित्य साधून मोफत डोळे तपासणी व अल्प दरा मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये ८२ जणांनी या सुविधेचा लाभ घेतला यावेळी लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्विन सिटी सिटी चे माजी अध्यक्ष अभियंता सागर पुकाळे प्रथम उपाध्यक्ष राजेश परसगोंड लायन्स नेत्रालयाचे श्री म्हमाणे व सौ सुवर्णा काळे यांच्या सह चौंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अशोक महाजन उपाध्यक्ष काशिनाथ भागवत खजिनदार सौ. हेमा देवांग यांच्यासह समाज/ बांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.