पंढरपूर प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि.19-2-24 सोमवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुक्याच्या वतीने गाव भेट दौरा व बैठक आयोजित करण्यात आली होती.
25 फेब्रुवारी सोलापूर येथे संविधान सन्मान मेळावा होणार आहे तसेच गाव तिथे शाखा,मी रिपब्लिकन सदस्य जोडो अभियान ह्या विषयावर करकंब गटात गाव भेट दौरा करून करकंब येथे बैठक घेण्यात आली.हया बैठकीचे अध्यक्ष रिपाइं तालुकाध्यक्ष संतोष पवार हे होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा.राज्य सचिव सुनिलजी सर्वगोड,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव,बाळासाहेब कसबे,कुमार भोसले हे होते.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे, ता.सरचिटणीस दयानंद बाबर,ता.कोशाध्यक्ष विजय वाघमारे, करकंब शहर अध्यक्ष राजु शिंदे, प्रविण माने पटवर्धन कुरोली चे माजी सरपंच अरविंद डावरे, देवडेचे माजी सरपंच रामभाऊ मोरे, करकंब ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे,भागवत लोंढे, करकंब ग्रामपंचायत माजी सदस्य महेंद्र शिंदे,प्रदीप कंकाळ, शंकरराव सरवदे, आदिनाथ शिंदे, आकाशभैया शिंदे,ता.युवक खजिनदार रणजित शिंदे,मनोज शिंदे,देवडे ग्रामपंचायत सदस्य मोहन मोरे, सुगाव भोसे चे दिलीप कडाळे सांगवी चे राघू चव्हाण व्होळेचे प्रमोद बाबर, शिवाजी शिंदे, नेताजी शिंदे,राजरत्न सरवदे, आदित्य कांबळे,सोन्या शिंदे तसेच तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.