पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांचा आज वाढदिवसानिमित्त सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते तुळशी कंठा, उपरणे, मुर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व सर्व खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राजे यांच्या पायाला दुखापत झाली असताना देखील त्यांनी आजच्या सभेत सहभाग नोंदविला. त्यांनी हा जो मनःपूर्वक सहभाग घेतला, त्यातून वारकरी-भाविकांच्या हिताबद्दल त्यांना असलेली आंतरिक तळमळ दिसून येते. त्यांना आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो हीच विठ्ठल रूक्मिणीमातेच्या चरणी प्रार्थना.