सोलापूर प्रतिनिधी
विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शाळेची शैक्षणिक सहल महाबळेश्वर,पाचगणी प्रतापगड, रायगड, महाड, हरिहरेश्वर, दिघी, दिवेआगर, समुद्र बीच, मुरुडचा जंजीर किल्ला आदी पर्यटन ठिकाणी जाऊन आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा शिक्षकांसह १३० विद्यार्थी या चार दिवसीय सहलीत सहभागी झाले होते.
थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसरातील दहा विविध पाँइंट दाखविण्यात आले.सन राईज व सन सेट पाँइंटने विद्यार्थ्यांना सुर्योदय व सुर्यास्त दाखविण्यात आले.थंड हवेचा, सुंदर निसर्ग ठिकाण व उत्कृष्ट हवामानाचा प्रत्यक्षात अनुभवता आले.पाचगणी येथील टेबल पाँइंटसह स्ट्रॉबेरीचे झाडे असलेल्या शेतीला व विविध चॉकलेटचे फॅक्टरीला भेट देण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेल्या प्रतापगड, रायगड, जंजिरा किल्ला येथील बुरुज ,तटबंदी, महाद्वार पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.प्रतापगडावरील पराक्रमाची आठवण, रायगड चढण्याची क्षमता समुद्र सपाटी पासूनची उंची अश्या विविध प्रकारचे माहिती देण्यात आली.समुद्रातील बेटावरील जंजिरा किल्ला दाखविण्यात आले.पंचगंगा नद्या,सह्याद्रीच्या पर्वत रांगा व डोंगर दरी पहाता आले. विद्यार्थ्यांना तीन ठिकाणी अरबी समुद्र किना-याचा आनंद घेता आले.विद्यार्थी पहिल्यांदा विशाल समुद्राचा अनुभव घेतले. समुद्रातील लाटा व बोटिंग प्रवास हे अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले.
सहल यशस्वी होण्यासाठी सहल प्रमुख विशाल खाडे, विश्वनाथ तंबाके,अमोल गुड्डेवाडी,हणमंत कुरे, बजरंग सिरसट,शितल पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, मारुती कांबळे,संगीता नरगिडे, सुजाता फुलारी, वैशाली गुजर, विश्वनाथ उंबरगीकर, नागेश कलंत्री आदींनी परिश्रम घेतले. चार भिंतींच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना भौगोलिक, ऐतिहासिक ठिकाणांची परिपूर्ण माहिती मिळावी तसेच मनोरंजनासह विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रेक्षणीय स्थळांचे ज्ञान, आकलन, चिकित्सकवृत्ती वाढावी यासाठी ही शैक्षणिक सहल काढल्याची मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितले.
शासनाच्या नियमानुसार नियोजन करुन शिस्तबद्ध पद्धतीने सहल यशस्वी झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी अभिनंदन केले.