भाळवणी प्रतिनिधी
भाळवणीत अरुणोदय सेवा न्यास व कै. सौ. मैना सुदाम कलढोणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. चित्रकला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाळवणी येथे व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 रोजी 11 वाजता श्रीराम मंदिर, शुक्रवार पेठ भाळवणी येथे करण्यात आलेले आहे. वक्तृत्व स्पर्धा पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरीता आहे. सदर स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन प्रकारच्या स्वरूपात घेतली जाणार आहे.
वकृत्व स्पर्धेचे विषय 1)छत्रपती शिवराय 2) माझे आई-वडील 3) स्वच्छता काळाची गरज 4) पाणी आडवा, पाणी जिरवा 5) झाडे लावूया , झाडे जगू या 6) आपले आरोग्य आपल्याच हाती 7) व्यसनमुक्ती काळाची गरज 8) मोबाईल जगणे हिरावतो आहे 9) तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
चित्रकला स्पर्धेसाठी विषयी 1 स्वच्छता अभियान,2) पाणी आडवा पाणी जिरवा 3)माझी आई 4)निसर्ग चित्र 5)माझी शाळा 6)माझ गाव 7)वृक्षारोपण 8)फ्री हॅन्ड चित्र
चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी असेल. ऐनवेळी प्रवेश मिळणार नाही. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास 1001 रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास 751रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक विद्यार्थ्यास 501रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह, चतुर्थ क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास 351रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह तसेच पंचम येणाऱ्या विद्यार्थ्यास 201 रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा. नाव नोंदणीसाठी कल्याण कलढोणे, 9766477031.देवानंद गोंजरी 9767276345,सुनील गवळी गुरुजी 9850058027 यांना संपर्क साधावा.