धोंडेवाडी प्रतिनिधी
आज दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी श्रीमंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जैनवाडी धोंडेवाडी ता.पंढरपूर या प्रशालेत शुभेच्छा समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अतुल म्हेत्रे उपविभागीय अधिकारी कराड जिल्हा सातारा तसेच प्रमुख अध्यक्ष समाधान दादा काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष, राजेंद्र वाघमारे मंडल अधिकारी करकंब_ , भाळवणी गावचे सरपंच रणजित जाधव ,माजी सरपंच दिलीप भानवसे , धनंजय धोत्रे, सचिन देठे, स्वप्निल देठे, आकाश पासले , प्रतिष्ठित नागरिक आणि इ.५ वी ते इ. १२ वी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दादांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले, यावेळी अध्यक्ष निवडीची सूचना गायकवाड सरांनी केली याला अनुमोदन काळे सुग्रीव दिले.प्राचार्य कौलगे सरांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये शाळेमध्ये राबविण्यात येणारे उपक्रमाची माहिती देण्यात आली तसेच इयत्ता १० वी व १२वी यांची संपूर्ण वर्षाची तयारी कशाप्रकारे केली जाते ही माहिती सांगितली. पाहुण्यांचे हस्ते NMMS परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच NMMS विभाग प्रमुख मदने सर यांचा ही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
तसेच १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेमधील मिळालेल्या संस्कारांची शिदोरीचा भविष्यात नक्कीच फायदा होईल अशी ग्वाही दिली.प्रमुख पाहुणे अतुल म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून यशाची शिखरे सर करावीत असा बहूमल्य संदेश दिला.
यावेळी समाधान दादा काळे म्हणाले यांनी आपल्या वाणीतून जिद्द आणि चिकाटी वर अशक्य गोष्टी शक्य होतात अशा प्रकारचे मार्गदर्शन केले.सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पासले सरांनी केले आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.