समाजातील युवकांना प्रेरणा मिळण्यासाठीच पुरस्कार चे आयोजन अभिषेक रंपुर
सोलापूर प्रतिनिधी
भावसार युवक आघाडी तर्फे भावसार समाजातील विविध क्षेत्रातील प्रविण्य मिळालेल्या तसेच समाजातील युवा कार्यकर्ते ना भावसार युवा आदर्श पुरस्कार समाजातील प्रमुख व्यक्ती च्या हस्ते देण्यात आला
व्यासपीठावर भावसार समाजाचे अध्यक्ष श्री राजकुमार हंचाटे, बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू ढगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर भावसार पतसंस्था चे चेअरमन श्री किरण क्षीरसागर, समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर, भावसार व्हिजन चे संजय पतंगे, भावसार महिला आघाडी अध्यक्ष सरिता जवळकर आदी उपस्थित होते.
जय हिंगला जगेली 40वर्षांपासून भावसार युवक आघाडी चे काम चालू आहे.याही वर्षी आम्ही भावसार समाजातील युवक व युवती ज्यांनी विशेष प्रावीन्य विशेष पदवी मिळवली आहे त्याचा सत्कार करीत आहोत.सत्कार मुळे येणाऱ्या विद्यार्थी व युवकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन भावसार युवक आघाडी चे अध्यक्ष श्री अभिषेक रंपुरे यांनी कार्यक्रमात केले.
भावसार शिक्षण मंडळ वर निवड झालेल्या बापु ढगे व उपाध्यक्ष पदी निवड झालेले अश्विन डोईजोडे यांचा सत्कार देखील करण्यात आला.
युवा आदर्श पुरस्कार मानकरी खालीलप्रमाणे
वधू वर चे काम करणारे अमोल हिबारे, bbc वर काम करणारे हर्षल आकुडे, चार्टड अकाउंट परीक्षेत जी सर्वात अवघड परीक्षा असते त्यात पास झालेले सौरभ अंबुरे, सोनल पुकाळे, वैष्णवी बासुतकर, डॉक्टर झालेल्या वैष्णवी बोंडगे तसेच शैशाणिक क्षेत्रातील प्रमोद हनचाटे सर या सर्वांचा भावसार युवा आदर्श पुरस्कार देऊन ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच नुकतेच पुणे व जालना येथे झालेल्या भावसार क्रिकेट स्पर्धा मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भावसार क्रिकेट बांधवाचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच नुकतेच भावसार युवक आघाडी तर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती त्याचे सुद्धा बक्षीस वितरण याच कार्यक्रमात करण्यात आला.
भावसार व्हिजन चे लक्ष्मीकांत मुसळे, माधव वळसे, द्वारका क्षीरसागर, आशिष कटारे, जेष्ठ नागरी संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर समाज बांधव यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावसार क्षत्रिय समाजाचे उपाध्यक्ष साई क्षिरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार रोहन महिंद्रकर,सचिव विकास उपरे, सह सचिव रोहित महिंद्रकर,उपाध्यक्ष ओंकार घनाते, सह कार्याध्यक्ष यश गर्जे, प्रसिद्धी प्रमुख तिलक क्षिरसागर, सह खजिनदार आदित्य महिंद्रकर, श्रीकांत उपरे, रमाकांत घनाते, ओम खोकले आदी नी परिश्रम घेतले.सूत्र संचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले.तर आभार साई क्षीरसागर यांनी केले