भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे तेज न्यूज परिवाराच्या वतीने मकर संक्रात सणाच्या निमित्ताने महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन वाडीच्या सरपंच कल्पना मोहन माने यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्री ताड होत्या.
यावेळी मंगल लंगोटे,अंजना पासले,राणी पासले,शैला पोरे, लता कपडेकर,शालन आगलावे, नतून बंडगर,मनीषा रोकडे, कमल वाघमारे,शैला हिंगमिरे,जयश्री शिंदे,सुमन शिंदे,रुपाली लंगोटे,भारती निराळी,वर्षा गांधी, वर्षा बिडवे, सुप्रिया बिडवे, उमा शिंदे, प्रतिभा शिंदे,अंनघा देशपांडे, वंदना विभुते, भागीरथी जाधव,दिपाली कारंडे, तसलीम शेख , शाहीन शेख, सोनाली साळवे, संगीता लाले, सारिका निराळी , रुपाली लंगोटे, मैमुना तांबोळी, आदि मान्यवर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन कुसुम माळवदे यांनी केले.तर प्रास्ताविक साक्षी माळवदे यांनी केले तर आभार प्राची माळवदे यांनी मानले.