भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी गावचे नुतन सरपंच रणजित जाधव आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याचे नूतन संचालक सुनिल पाटील यांनी आमचे घरी सदिच्छा भेट दिली.त्याबद्दल त्या दोंघाचा सत्कार सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी ग्राम क्रांती तिसरी आघाडीचे नेते विजय शिंदे,अमोल लिंगे,सद्दाम सय्यद ,संदीप जाधव,तेज न्यूज़चे संपादक प्रशांत माळवदे,सुहास सराटे , दत्ता देशमुख,शुभम शिंदे व मित्र परिवार उपस्थीत होते.
यावेळी रणजित जाधव म्हणाले की माझ्या निवडी करिता सर्वांनी सहकार्य केले आहे.त्यांचे ऋण मी कधी ही विसरणार नाही. यापुढे हि मला आपले सहकार्य राहावे.अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी आमचे परिवारातर्फे त्यांचा नुतन सरपंच पदी निवड झालेबददल सत्कार करण्यात आला.