माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
भारत भूषण पुरस्कार प्राप्त अकलूज येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. एम. जी. तांबोळी यांची केंद्रीय मानवधिकार संघटन दिल्ली च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीचे पत्र व आय कार्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी अॅड. एम. जी. तांबोळी म्हणाले कि, मानवी हक्क अधिकार, मुलभूत अधिकार, लोकांच्या प्रश्नांसाठी व समाजासाठी सेवा करण्यासाठी ही मोठी संधी आहे. येणाऱ्या काळात मानव अधिकारांचा आवाज बुलंद करून न्यायासाठी झगडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी कायदेशीर सल्लागार अॅड. धनंजय बाबर, केंद्रीय मानवधिकार संघटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे, महाराष्ट्र उपाध्यक्ष भैय्या बाबर, डायरेक्टर बाळासाहेब काटे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वजाळे इत्यादी उपस्थित होते.