सोलापूर प्रतिनिधी
द्विशताब्दी वर्ष पूर्ती महोत्सव साजरा करणारी महाराष्ट्रातील एकमेव खाजगी प्राथमिक अनुदानित करंजकर विद्यालय येथे दि.9 जानेवारी 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री.नीलकंठप्पा कोनापुरे यांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.शोभाताई बनशेट्टी माजी महापौर,श्री.संजयजी कोळी माजी सभागृह नेता, श्री.जगदीशअण्णा पाटील माजी सभागृह नेता, श्री.महेंद्र सोमशेट्टी अध्यक्ष श्री नगरेश्वर देवस्थान,श्री.मल्लिकार्जुन हिरेमठ अध्यक्ष जंगम समाज,सौ.नीता स्वामी अध्यक्ष जंगम समाज महिला आघाडी,श्री.ऋषिकेश नागावकर राऊंड टेबल सदस्य सोलापूर,श्री.आप्पासाहेब पाटील उपाध्यक्ष राज्य शिक्षकसेना पुणे विभाग,श्री. राजकुमार पाटील,संस्थेच्या सचिवा श्रीमती धानम्माताई मध्दली, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मल्लिनाथ बरडोल, संस्थेचे सदस्य श्री.अजय मध्दली, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री तडकासे व पालक सभेचे उपाध्यक्ष श्री गणेश ढेकणे व सौ सुरेखा गायकवाड या सर्वांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली श्री.संतोष साठे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राजश्री तडकासे यांनी प्रस्ताविक तर अहवाल वाचन पर्यवेक्षक श्री.लक्ष्मण पवार यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजश्री तडकासे यांना विमा सल्लागार सौ.औंदप्पा पुजारी यांच्यातर्फे आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सन्मानित करण्यात आले व शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला.
तसेच शाळेतील शिपाई श्रीमती कमल दडे यांनाही सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य, कला गुण उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.श्रीदेवी येळमेली व सौ अरुणा हणमगाव यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.रुद्रमणी स्वामी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वात शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने ज्येष्ठ शिक्षिका सौ. अलका मलगोंडे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.