पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
लोकनेते शिक्षणमहर्षी स्व. डाॅ.पतंगरावजी कदम साहेब यांचा जयंती सोहळा रुक्मिणी विद्यापीठ संस्थापक सचिवा सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांचे मार्गदर्शनाखाली मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर येथे प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड. यांचे शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रुक्मिणी परिवाराच्या व प्रशालेच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचे जीवन चरित्रावर बोलताना सविता लोखंडे म्हणाल्या की 180 पेक्षा जास्त असलेल्या शाळा, कॉलेज देशात व प्रदेशात उभे करून गोरगरिबापासून श्रीमंता पर्यंतच्या मुला मुलींच्या उच्च शिक्षणाची भारती विद्यापीठात सोय करून देणारे डॉक्टर पतंगराव कदम हे थोर शिक्षणमहर्षी होत. वाड, वडिलांचा घराण्याचा कोणताही आधार नसताना देशाच्या विविध भागात राजकीय ,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर काम करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे हा त्यांचे स्वभावातील विशेष गुण असल्याचेही त्यांनी सांगितले .कमवा व शिका या योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत करत त्यांनी शिक्षण घेतले. मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम या संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब कुटुंब व विद्यार्थ्यांना आर्थिक व शैक्षणिक मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना मानवता सेवा अवाॅर्ड,मराठा विश्वभुषण,आय एम.एम.,उद्योग भुषण अशा अनेक पुरस्काराने त्यांचा गौरव झाल्याचेही त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह पालक वर्ग उपस्थित होता .कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके , कुमुदिनी सरदार , फरहाणा कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभावरी डुबल यांनी केले.