पंढरपूर प्रतिनिधी
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी अनुलोम च्या वस्ती मित्रांना प्रभू श्री राम यांची कोदंड धारी मूर्ती प्रदान केली आहे.त्या मूर्तीचा स्वीकार केला .
त्यावेळी श्री विठ्ठल मंदिर परिसरातील वस्ती मित्र बाळकृष्ण गोविंद डिंगरे यांनी पंढरपूर मंगळवेढा भाग जनसेवक रामेश्वर वसंत कोरे पंढरपूर यांचे कडून स्वीकारली.
यावेळी राष्ट्रीय वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते हरी भक्त परायण श्री रामकृष्ण वीर महाराज , संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सचिन लादे , हिंदू महासभेचे प्रांतिक नेते अभयराजे इंचगावकर,सोलापूर तरुण भारतचे पत्रकार महेश खिस्ते, भाजपचे नेते आशुतोष देशपांडे इत्यादी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.