पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
डॉक्टर महेश कुमार सुडके यांची उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल यांचा युवक काँग्रेसच्या व काँग्रेस कमिटी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळेस काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष अमरजी सूर्यवंशी युवा, काँग्रेस शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवा दल शहराध्यक्ष गणेश माने, शिव क्रांती संस्थापक अध्यक्ष दत्ता काळे, युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष सोमनाथ आरे, काँग्रेस कमिटी शहर सरचिटणीस महेश आधटराव युवक काँग्रेस उपाध्यक्ष रवी अग्रवाल उपस्थित होते.