पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर चे ट्रॅफिक महिला पोलिस कविता चोपडे यानी 200 रुपयाची अवैध मागणी केलेले पैसे वाहनचालकाने न दिल्याने वाहन चालकांचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पंढरपूर चे तत्कालीन एसडीपीओ कदम psi गाडेकर psi निंबाळकर, महिला psi मनीषा महाडिक पोलिस कर्मचारी हजारे, वाघमारे, कविता चोपडे, शीतल राऊत, सोनाली इंगोले, भाग्यश्री घाडगे, अशा 10 दोषी पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायाधीश श्री जस्टिस श्रीहरी डावरे, व श्री उमाकांत मितकर सदस्य महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण , मुंबई यांच्या खंडपीठाने आज रोजी निकालात दिले आहेत.
आज तीन वर्षांनी अर्जदार वाहनचालक यांना न्याय मिळाला आहे. सदर केस मध्ये कायद्याचा अभ्यास करणारे कुणाल शिरगिरे यांनी कामकाज पाहिले आहे.
पोलिसांनी केलेल्या अन्याया विरुद्ध नागरिकांनी महाराष्ट्र पोलिस तक्रार प्राधिकरण येथे दाद मागितल्यास न्याय मिळतो .असे मत मितकर यांनी सांगितले.