१५० हुन अधिक योगप्रेमी शिबिरात सहभागी
गोरेगाव प्रतिनिधी पुनम पाटगावे
रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्हा आणि व्हीनस कल्चर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सामूहिक १०८ सूर्यनमस्कार शिबिरामध्ये १५० हून अधिक योगप्रेमी सहभागी झाले होते. ह्या कार्यक्रमामध्ये गोरेगाव विभागातील सन्माननीय आमदार श्रीमती विद्या ठाकूर, समाजसेवक व स्नेहमानव फाऊंडेशन चे विश्वस्थ अमृतलाल नगडा , योगाचार्य व योगशिक्षिका श्रीमती डॉ. निशा ठक्कर , योगाचार्य व योगशिक्षक ओमप्रकाश तिवारी आणि संरक्षण शास्त्र शिक्षक पंकज रमेश येवले असे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याचा ह्या पहिल्याच उपक्रमामध्ये योगसाधकांचा भरभरून प्रतिसाद लाभला व सर्व योगसाधकांनी १०८ सूर्यनमस्कार झाल्यानंतर जल्लोषात आनंद साजरा केला.
या सर्व नियोजनात मुंबई जिल्ह्याचे महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ पौर्णिमा काळे आणि उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई, श्वेता पिसाळ, रेश्मा धुरी पाटील, साक्षी कलगुटकर, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, मीडिया प्रभारी निलेश साबळे, सोशल मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, सचिव सुषमा माने, अमित चिबडे, वर्षा शर्मा, विजयालक्ष्मी शर्मा, कार्यालय सचिव जयदीप कनकीया, संघटन सचिव विकास ओव्हाळ, सदस्य पूजा कुसनुरे, कृष्णकुमार शिंदे, मीनल काळे, शालिनी भंडारी, केशर कुलाबकर, अर्निका बांदेलकर, प्रियांका खाडे, राज्य महिला प्रकोष्ट प्रभारी शर्मिला चंदा, स्फूर्ती जेधे, टेक्निकल टीम आकाश साखरकर, हेरंब म्हात्रे, अमोल देवघरकर यांच्या सर्वांच्या मेहनतीने हे उपक्रम यशस्वी झाल्यामुळे मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री संतोष खरटमोल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.