वेळापूर येथे राजमाता जिजाऊ जयंती, पत्रकार दिन व विद्यार्थी खेळाडू सन्मान सोहळा संपन्न
माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
वेळापुर हे माळशिरस तालुक्याचे केंद्र बनत असुन वेळापूरचे खेळाडू गावाचे नाव देश पातळी वर गाजवत आहेत. परंतु दुर्भाग्य आहे की वेळापुरच्या खेळाडूंना सरावासाठी प्रशस्त क्रिडा संकुल नाही. त्यामुळे वेळापुरला प्रशस्त क्रिडा संकुल व पत्रकार भवन झाले पाहीजे असे प्रतिपादन वेळापूर येथे बहुजन मुक्ती पार्टी आयोजित राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती तसेच पत्रकार दिन व विद्यार्थी खेळाडू सन्मान सोहळा प्रसंगी काकासाहेब जाधव प्रवक्ता बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य यांनी केले.
वेळापूर येथील रामोशी गल्ली गणपती मंदिर समोर बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त तसेच पत्रकार दिन व विद्यार्थी खेळाडू सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळा प्रसंगी वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब धाईंजे, समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष महादेव ताटे, ता.अध्यक्ष आरपीआय मिलिंद सरतापे, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, माजी उपसरपंच वेळापूर मल्हारी बनकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती वेळापूर अध्यक्ष युवराज मंडले, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर सौ. अश्विनीताई भानवसे, विनायक चंदनशिव, डॉ.धनंजय म्हेत्रे, तालुका अध्यक्ष कैकाडी समाज संघटना राजाभाऊ जाधव, लखनतात्या मंडले, मैनुद्दीन दरवेशी, महेश साठे, अध्यक्ष श्री संत रोहिदास बहुउद्देशीय सामाजिक संस्था विनायक भगत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था महेंद्र साठे, सुनील साठे, अशोक जाधव, शाहीर मुलाणी, तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रदीप सरवदे, रणजीत साठे सर, महादेव नाईकनवरे, संभाजी जाधव, छत्रपती क्रांती सेना वेळापूर अध्यक्ष बाबू चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य अमजद शेख, संजय पनासे, बापूसाहेब आडत, खंडाळी ग्रामपंचायत सदस्य रिकेश चव्हाण, बहुजन मुक्ती पार्टी माळशिरस तालुका सचिव राहुल गायकवाड, समता परिषद वेळापूर अध्यक्ष शिवाजी मोहिते, नाथाची मोहिते, अजित बनकर, सुखदेव आडत, राष्ट्रीय नाभिक संघटना तालुकाध्यक्ष राहुल सराटे, शहराध्यक्ष प्रमोद साळुंखे, विठ्ठल माने, पिनू लोखंडे, लालासो गेजगे, भैय्या कोडग, सिकंदर कोरबू, मच्छिंद्र जाधव सह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक त्यांचे पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळापूर परिसरातील इंग्लिश स्कूल वेळापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय वेळापूर, लोकविकास विद्यालय वेळापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली, पिसेवाडी आदी शाळांतील विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वेळापूर परिसरातील पत्रकार बंधावांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन काकासाहेब जाधव मित्रपरिवार व टायसन ग्रुप तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पिनूभाऊ येडगे, शामभाऊ मंडले, नागेश वाघमारे, समाधान मंडले, अनंत मंडले, सौरभ वाघमारे ,आबासाहेब वाघमारे, सोमनाथ मारकड, अजित माने, दिलीप बोडरे, बापू साठे, दादा मंडले धनाजी वाघ, बालम दरवेशी, गणेश मंडले, सुरेश मंडले, नारायण सर्वगोड, तेजस सकट ,कमलेश कसबे, विजय जाधव, अक्षय जाधव, संजय शेंडगे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालम दरवेशी यांनी केलं तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिनूभाऊ येडगे यांनी केले आणि आभार पत्रकार अमोल साठे यांनी मांडले.