टेंभूच्या पाण्यामुळे मान नदी काठावरील शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उगवल्याने माझं स्वप्न साकार झाले , जे आजोबाला जुळलं नाही,ते तुम्हाला कुठं जमायचं नादाला लागू नका , पण आम्ही दोघं माण नदीचा तळ तुम्हाला दिसू देत नाही - आ.शहाजीबापू पाटील
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी चळवळ उभी करून संघर्ष केला, आंदोलनं झाली , जनावरांसह उपोषणं केल्यामुळे आज टेंभूच्या पाण्यामुळे माण नदीकाठावरील शेतकऱ्यांसाठी सोनियाचा दिवस उगवल्याने माझं स्वप्न साकार झाले. परंतु विरोधक आजही गणिते करू पाहत आहेत, गणित समजून घ्यायचा असेल तर माझ्याकडे या , तुमच्या आजोबाला जे जुळलं नाही, ते तुम्हाला कुठं जमायचं नादाला लागू नका , आमचं आम्ही गणित करतो पण माण नदीचा तळ तुम्हाला दिसू देत नाही शब्द दीपकआबा आणि मी तुम्हाला देतो असे विश्वास पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील यांनी वाटंबरे येथील नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त दिला.
सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना १ टीएमसी व माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून ३ वेळा भरण्यासाठी ०.६०० एमसीएफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल वाटंबरे ता. सांगोला येथील ग्रामस्थ व लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने शनिवारी पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचा बांधून शाल पुष्पहार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, संभाजी आलदर, प्रा.संजय देशमुख, विजय शिंदे, सुभाष इंगोले,सरपंच किरण पवार, सागर पाटील, दादासाहेब लवटे, उद्योजकआनंद घोंगडे ,गुंडा खटकाळे, समीर पाटील, अमोल नलवडे, विजय बाबर, दिपक पवार, महादेव पवार, विजय पवार, शहाजी घाडगे, दिपक दिघे, सुर्यकांत पवार,सुब्राव पवार,बिरा गेजगे,जलदूत मधुकर पवार, दिनेश धनवडे, अनिल पवार,धीरज पवार आदी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आरपीआय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दीपक आबा म्हणाले, पाण्याची खरी सुरुवात सन १९७२ साली कै. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या रूपाने झाली परंतु काळाने त्यांना हिरावून घेतले त्यानंतर गेल्या ५ वर्षाच्या काळात तालुक्याच्या विकासाच्या पर्वाला चांगला मुहूर्त मिळाला. मी आणि बापू दोघे मिळून विकास कामांबाबत निर्णय घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करतो, आज पर्यंत जेवढी पत्रे सरकारकडे दिली त्यामध्ये मोकळ्या हाताने बापू कधी परत आला नाही. आम्ही सर्व मंजूर करून आणून ठेवले असून भविष्य काळामध्ये लाभधारक शेतकऱ्यांना पैसे भरण्याची मानसिकता ठेवून पाण्याची वहिवाट चालू ठेवावी लागेल. आम्ही आणून देण्याचं काम केले ते चालवण्याचं काम तुमचे आहे. शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता पीक पद्धत बदलून शेतीला शिस्त लावली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी भाजपचे डॉ विजय बाबर,प्रा संजय देशमुख, संभाजी आलदर, विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक विकास पवार यांनी केले.
वाटंबरे ग्रामस्थ व लाभार्थ्यांच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी हलगीच्या तालावर मिरवणुक काढून पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचेवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले.
मी शंभर... शंभर.. वेळा दीपक आबांचे आभार मानतो. त्यांनी मला संधी दिल्यामुळे मी आमदार झालो म्हणूनच आज तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करू शकलो अन्यथा आजही आपला दुष्काळ असाच राहिला असता. जनतेच्या आणि दीपक आबाच्या साथीने व ताकतीने शिवसेनेतून तालुक्यात विकासाचे पर्व उभे राहिले-
आमदार शहाजी बापू पाटील