सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेले संदेशपत्राचे वाचन शिवानंद पुजारी यांनी केले. या संदेश पत्रातून विद्यार्थी हे राज्याचे, देशाचे भविष्य आहेत. तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला, क्रीडा, ज्ञान, विज्ञान अशा विविध क्षेत्रांत पारंगत व्हायला हवे. 'शासन आपल्या दारी' सारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातील कोट्यावधी नागरिकांना याचा लाभ होत आहे. तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल, पुस्तके, गणवेश यांसह अनेक वस्तू, साधने आपण उपलब्ध करून देत आहोत. तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच हा सर्व खटाटोप सुरू आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा उपक्रमांतर्गत येणारे शालेय परिसर स्वच्छता, आरोग्य तपासणी, पालकांचा सहभाग यासंदर्भात विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदेशपत्रातून केले आहे. याप्रसंगी प्राचार्य रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते.