भाळवणी प्रतिनिधी
वाडीकुरोली¹धोंडेवाडी ता.पंढरपूर येथे वसंतराव (दादा) काळे यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे आय टी आय कॉलेज,‚ जनकल्याण नर्सिंग कॉलेज ए एन एम व मुक्ताई नर्सिंग कॉलेज जी एन एम यांच्यावतीने कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी डॉ.आनंद कुलकर्णी (अस्थीरोग तज्ञ) समाधान दादा काळे (युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष)‚ मालन काकू काळे (संचालिका सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना) राजाभाऊ माने संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना ‚बाळासाहेब काळे (उपाध्यक्ष वसंत दादा प्रतिष्ठान) लाडाबाई काळे (सरपंच वाडीकरोली) संगीताताई काळे (अध्यक्ष वसंतदादा मेडिकल फाउंडेशन) मोनिका काळे ‚ डॉ.जयश्री शिनगारे ‚ सुनीता काळे‚ प्राचार्य ,शिवाजीराव बागल‚ प्राचार्य दादासो खरात ‚ प्राचार्य ,शिवाजी शेंडगे ‚ प्राचार्य अनिल कोलगे ‚ मुख्याध्यापक ,नंदकुमार दुपडे‚ प्राचार्य गीतांजली खाडे‚ मुख्याध्यापक संजय काळे उपस्थित होते.
यावेळी याप्रसंगी प्रास्ताविक डॉ. सुधीर शिनगारे व प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले.
यावेळी बोलताना समाधान काळे म्हणाले की नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा आपल्या हातून घडते हे मोठे भाग्याचे काम आहे तसेच आय टी आय विद्यार्थीनी व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजक होऊन आपल्या संस्थेचे नाव लौकिक करावे.
यावेळी प्राचार्य शिवाजीराव बागल‚संगीताताई काळे ‚ प्राचार्य दादासो खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य संतोष गुळवे ‚ प्राचार्य एस.एम काझी, प्राचार्य एस जे अहिरसंग‚ उपप्राचार्य विद्या कुचेकर शिक्षक व शिक्षकक्तेर कर्मचारी ‚ पालक‚ विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.समाधान काळे यांनी केले व अनिल ननवरे यांनी आभार मानले.