सोलापूर प्रतिनिधी
सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज केगांव येथे अतिशय उत्साही वातावरणात वार्षिक स्नेहसंमेलन “रेट्रो ते मेट्रो” पार पडले. प्रमुख पाहणे म्हणून श्री. विजय कबाडे (उप आयुक्त सोलापूर शहर), श्री. अमोल भारती (पोलीस उप अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री. संजय नवले (संचालक/सहसचिव- सिंहगड संस्था) यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. सदर स्नेहसंमेलनासाठी नृत्य परीक्षक म्हणून श्री. दीपक हुलसुरे (उपविजेता- महाराष्ट्र बेस्ट डान्सर, उपविजेता-डान्स इंडिया डान्स सीजन-6) व शरद रणदिवे (डान्स जज) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून करण्यात आली. त्यानंतर प्रि-प्रायमरीच्या बाल-गोपालानी मोगली डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली तर “रेट्रो ते मेट्रो” प्रमाणे हिंदी मधील तसेच मराठी मधील सादर झालेल्या गाण्यांमध्ये यामध्ये राज कपूर, शम्मी कपूर, देवानंद, धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांच्या गीतांनी अक्षरश प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. त्यानंतर ९० च्या दशकातील गोविंदा, शाहरुख खान, अमीर खान, सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय तसेच आधुनिक काळातील रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोन यांच्या गाण्यांनी अक्षरश धुमाकूळ घातला. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट नृत्य सादरीकरणाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अभियांत्रिकी महाविद्याल, पंढरपूर चे प्राचार्य डॉ. कैलास कारंडे, सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूरचे प्राचार्या सौ. चेताली मराठे, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल, सोलापूरचे प्राचार्य. डॉ. शंकर नवले, CRTD Emeritus- संचालक डॉ. एस.एच. पवार, एस. एम. जगदे, डॉ. आर.टी. व्यवहारे इ. मान्यवर अतिथी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक वसीम इनामदार व नाझिया पटेल तसेच प्रत्येक वर्गातील आप-आपल्या डान्सच्या मुलांनी केले. कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शक सुदर्शन माने व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी केले. शाळेचे प्राचार्या निखत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले यांनी सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.