राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.. मनसे नेते दिलीप धोत्रे..
रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवरी रिसॉर्ट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने दरवर्षी सहकार शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यावेळी रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे चेअरमन, संचालक इत्यादी यामध्ये सहभागी होणार असून हे शिबिर दोन दिवस चालणार असून निवासी शिबिर आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार असून सहा जानेवारी शनिवार रोजी सकाळी साडे अकरा ते एक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे वित्तीय सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर दुपारी एक ते अडीच वाजता मुंबई सहकार बोर्डाचे सहकार विभाग अधिकारी सुरेश म्हसे यांचे सेवा सहकारी संस्था नोंदणी, व्यवस्थापन व कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी साडेचार ते सहा वाजता मुंबई हाउसिंग फेडरेशनचे सचिव डी. एस. वडेर यांचे गृहनिर्माण सहकारी संस्था व्यवस्थापन, कार्यप्रणाली व अडचणी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तदनंतर सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजता रोजगार व स्वयंरोजगार व सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रशिक्षक चेतन वाघ यांचे केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोजगार निर्मितीसाठीच्या योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. रात्री साडेसात ते नऊ वाजता कृषी तज्ञ व महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी दत्ता वानखेडे यांचे केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
सात जानेवारी रविवार रोजी सकाळी दहा ते अकरा वाजता मुंबई सहकार बोर्डाचे अधिकारी सुरेश म्हसे यांचे ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन होणार असून सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांचे संघटन, कौशल्य व नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
या शिबिराचा समारोप दुपारी दोन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात येणार असून महाराष्ट्रातील सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे अवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसे सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी केले आहे.