पंढरपूर प्रतिनिधी
आज शेळवे येथील सनराईज पब्लिक स्कूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून आनंदी बाजार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील निर्भया पथकाच्या पोलिस अधिकारी सौ.पवार उपस्थित होत्या तर त्यांचे सहकारी पोलिस अधिकारी अविनाश रोडगे,विनोद काळे साहेब तसेच भारतीय सैन्य दलातील जवान राहुल गाजरे ही उपस्थित होते,सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, प्रशालेतील विध्यार्थी दिपक साळुंखे यांनी आपल्या सुरेल आवाजात जिजाऊ गुणगौरव गीत सादर केले,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून बाजार दिवसाचे आयोजन करण्यामागील खास उद्देश सांगितला तर निर्भया पथकाच्या पोलिस अधिकारी सौ.पवार यांनी प्रशालेतील मुलं तसेच पालकांना अनमोल असे मार्गदर्शन केले,उपस्थित सर्व मान्यवरांचा आदर सत्कार करण्यात आला,सर्व मान्यवरांनाही प्रशालेतील बालचमुंच्या स्टॉल वरील खरेदीचा मोह आवरता आला नाही,त्यात दोन दिवसांवर संक्रात असल्या कारणाने सर्व पालक,ग्रामस्थ यांची खरेदी साठी एकच झुंबड उडाली,पालेभाज्या, फळभाज्या,फळे,विविध चमचमीत मसालेदार खाद्यपदार्थ,कपडे, खेळणी, संक्रातीसाठी आवश्यक सर्व साहित्य, वाण,खण इत्यादींच्या स्टॉल ने बाजार अगदी गजबजून गेला होता, इमिटेशन ज्वेलरी आपण सर्वत्र पाहतो मात्र या वर्षीच्या बाजार दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे २४ कॅरेट सोने चांदीचा ही स्टॉल लावण्यात आला होता..
जवळपास एकशे वीस स्टॉल च्या माध्यमातून सदर आनंदी बाजारामध्ये विध्यार्थ्यांनी एकूण एक लाख साठ हजार सातशे बहात्तर रुपयांची उलाढाल केली असून त्यामध्ये ज्वेलरी च्या स्टॉल ची सर्वाधिक म्हणजेच एकवीस हजारांची उलाढाल झाली..
सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक वृत्तीचा विकास व्हावा,त्यांना एखाद्या वस्तूची खरेदी किंमत,विक्री किंमत,नफा-तोटा, शेतकऱ्यांचे कष्ट, इत्यादी गोष्टींचे आकलन व्हावे, गणितीय क्रिया,व्यवहार ज्ञान,आकडेमोड,तोंडी हिशोब करता यावा, व्यावसायिक दृष्टीकोन वाढीस लागावा,आपल्या मालाचे व उत्पादनाचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करता यावे,उद्योगिक कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने दरवर्षी आपल्या प्रशालेत आनंदी बाजार दिवसाचे आयोजन करण्यात येते,याही वर्षी स्थानिक ग्रामस्थ, पालक परिवार,विध्यार्थी,तसेच मित्र मंडळी व सनराईज परिवारावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी सदर बाजार दिवसास उदंड प्रतिसाद दिला,संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तसेच संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी आजच्या बाजार दिवसाचे नियोजन पाहिले, विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक उलाढाल, व्यवहार याकडे प्रशालेतील सर्व शिक्षकांनी लक्ष ठेवले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले...!!
आमच्या शाळेतील आनंदी बाजार दिवसाच्या निमित्ताने मी आमच्या गणेश ज्वेलरीच्या दुकानातील काही ज्वेलरी स्टॉल लावून विक्रीसाठी मांडली होती,खरं तर आमचे वडील यासाठी तयार नव्हते मात्र मी हट्ट धरला आणि ज्वेलरीचे दुकान मांडले,संक्रातीच्या सनामुळे आमच्या माता भगिनींची जोडवी,मासोळ्या,आंगठ्या,एअर रिंग,बिचवे इत्यादी सोन्या चांदीच्या दागिन्यांना प्रचंड मागणी झाली,आज आमच्या गणेश ज्वेलरीची तब्बल एकवीस हजार पाचशे रुपये ची विक्री झाली;मला खूप मोठा अनुभव मिळाला,धन्यवाद..
कु.श्रवण तात्यासाहेब सरडे
सनराईज पब्लिक स्कूल,शेळवे .ई ४थी