भाळवणी प्रतिनिधी
वसंतराव काळे विद्यामंदिर ,चंद्रभागा नगर भाळवणी येथे आज दि.12/1/2024 रोजी प्रशालेत बाजार डे व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली .त्या निमित्ताने प्रशालेत मा.श्री सुनील पाटील संचालक स.शी. व. का.सह .सा. कारखाना ,भाळवणी.व मा.श्री हणमंत जमदाडे सचिव चंद्रभागा शिक्षण प्रसारक मंडळ ,यांचे हस्ते स्व .वसंत दादा काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बाजार डे चेउद्घाटन कारखान्याचे संचालक सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.त्याप्रसंगी अंकुश गायकवाड, विजय ढोबळे, समीर काझी, वासुदेव लिंगे,अर्जुन लोखंडे, हमीद शेख आदी मान्यवर व सर्व पालक उपस्थित राहून उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळे मॅडम यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक ,विद्यार्थी ,पालक यांनी परिश्रम घेतले.