सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि चार हुतात्मा स्मृती दिन आज शुक्रवारी साजरा करण्यात आला.
यावेळी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, डॉ.एस.एच. पवार, डॉ. विजयकुमार बिरादार यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि चार हुतात्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी मनोगत व्यक्त करताना राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एम. जगदे, प्रा.श्रीकांत जगताप, प्रा.सचिन गुरव, प्रा.सुमेध पाठक, प्रा. किरण पाटील, प्रा. मनीषा माळी, प्रा.एस.पी.तपकिरे, प्रा.माधुरी काशीद, पी.पी.शिंदे, सुप्रिया नलवडे, जी. डी. आतनूरे , के.बी.झांपा, विनायक नाळे व राहुल पाटील व तसेच शिक्षकेतर कर्मचारी सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ग्रंथपाल गणेश घोगले यांनी आभार मानले.