पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर व सिंहगड महाविद्यालय सोलापुर येथे इनोव्हेट यू टेकाथाॅन 2024 या राष्ट्रीय हॅकेथाॅन स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
सोलापूर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी हॅकाथॉन स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात येत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसिटीई) मान्यतेने इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून 'इनोव्हेट यु टेकाथॉन २०२४' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे १७ आणी १८ फेब्रुवारीला एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या आवारात आयोजन करण्यात येत आहे . चार लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत.
पुण्यासह प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण आज , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ.प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान संदीप श्रीरसागर, अभिषेक सावंत, आणि जयेश खामितकर उपस्थित होते. त्याचबरोबर सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय नवले,सिंहगड महाविद्यालाचे प्राचार्य प्रा.डाॅ. शंकर नवले यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. दरम्यान डॉ. आर. टी.व्यवहारे , डॉ. व्ही.व्ही. खरात, डॉ. एस. एस.श्री गन , आणी प्रा. ए.ए. कोलमते उपस्थित होते.
एआयसीटीई, एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचे प्रमुख साहाय्य या स्पर्धेसाठी असणार आहे. ब्रेनोव्हिजन ही संस्था तांत्रिक साहाय्य करणार आहे. एनईएटी (दिल्ली) यांचे मार्गदर्शन असणार आहे.
नोंदणीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संस्थेच्या innovateyou.in या वेबसाईटवर स्पर्धक नावनोंदणी करू शकणार आहेत.
विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांची रोख पारितोषिके या स्पर्धेतील विजेत्यांना दिली जाणार आहेत.