पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषदेने वाढविलेली करवाढ रद्द करावी व नागरिकांना आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, स्वच्छता, रस्ते वगैरे सुविधा देण्यावर भर देण्यात यावा अशी मागणी नागपूर येथील अधिवेशन दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित (दादा) पवार , यांचेकडे सहकार शिरोमणी चे चेअरमन तथा,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कल्याणराव काळे , श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ (दादा)भालके, माजी संचालक गणेश (दादा) पाटील यांनी केली.
निवेदनाची दखल घेऊन वाढीव करवाढ रद्द करण्याचे तात्काळ आदेश पंढरपूर नगरपरिषदचे प्रशासक तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.
यावेळी करमाळ्याचे आमदार संजय (मामा) शिंदे,युवा नेते संतोष सुळे उपस्थित होते.