पंढरपूर प्रतिनिधी
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा रय्यान तांबोळी याने प्रथम क्रमांक मिळवला.
जिल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये शिवरत्नच्या रय्यान तांबोळी याने घवघवीत यश संपादन केले नेहमीच क्रीडा विभागांमध्ये अग्रेसर असणारे शिवरत्न ज्युनिअर कॉलेज वेळोवेळी विविध स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी चमकावताना दिसत आहे .
नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया आट्यापाट्या स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेजचा रोहन भुसनर देशात दुसरा आला आहे. यानंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धा या महिन्यांमध्ये पूणे येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी रयान तांबोळी याची निवड झाली आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत या स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धा झाल्यानंतर राज्य स्तरीय स्पर्धा मुंबई येथे होणार आहेत.
त्याला पुढील वाटचालीसाठी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, सहशिक्षक राजेंद्र मोलाणे, दीपक भोसले , सोमनाथ भूईटे, संतोष पवार, नागेश कांबळे, नियाज मुलाणी, शितल मस्के, शितल बागल, वर्षा मोरे,सिमा रकटे, मसरूद्दीन पटेल,लिना बागल यांनी आभीनंदन केले.