आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा निर्धार...!!
सोलापूर प्रतिनिधी
शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड यांनी संपूर्ण जिल्ह्यात पदाधिकारी सुसंवाद दौरा केला..त्याचाच भाग म्हणून दि. 14 डिसेंबर रोजी अक्कलकोट रोड अस्मिता व्हीजन कार्यालय येथे शहर सोलापूर , दक्षिण तसेच उत्तर आणि मध्य मधील पदाधिकाऱ्यां समवेत सुसंवाद साधला. या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच हिंदुह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली.
या बैठकीदरम्यान उपस्थित असलेले शहर, दक्षिण तसेच उत्तर आणि मध्य विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना पक्षाला सोलापूर महानगरपालिका तसेच येणारी लोकसभा, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये घवघवीत यश कसे मिळवायचे त्या संदर्भातील निश्चित कृती कार्यक्रम , शिवाय पक्षाची ध्येय धोरणे यावर उपस्थित पदाधिकाऱी उपनेते अस्मिता गायकवाड, उपनेते शरद कोळी, सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरूषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख अमर पाटील,प्रा.अजय दासरी, महानगरपालिका समन्वयक विष्णू कारमपूरी, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील,यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले.
या बैठकीला शहर दक्षिण , उत्तर आणि मध्य मतदार संघातील पदाधिकारी... समन्वयक अरूण लोणारी,शहर संघटक समीउल्हा शेख शिवाजी ढोकळे,,राजु बिराजदार ,वैशाली देशपांडे, छाया वायदंडे, नसरीन शेख, संदीप बेळमकर, सचिन गंधुरे, अजय खांडेकर, सुरेखा वाडकर, महानंदा सावंत, मीना सुरवसे, मीनल दास, रेणुका शिंदे, प्रीती नायर, नाना मोरे, बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय गणेशकर, शशिकांत बिराजदार, वच्छलाबाई कदम, उज्वल दीक्षित, सिताराम बनसोडे, भाग्यश्री भालेराव, नम्रता वाघमारे, विश्वेश्वर गड्डम, अरुण जाधव, धर्मराज केकनाळकर, विकास डोलारे, माणिक कोळी, कृष्णाजी शिंदे, अमर वायदंडे, अरुण जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चरणराज केंगणाळकर यांनी आभार मानले.तर सर्वाचे स्वागत ॲड सुरेश गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले.