प्रसिद्ध चार्टर्ड इंजिनिअर सन्माननीय राजेश हलकुडे यांच्याकडून सलग दुसऱ्या वर्षी योगदान !
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जयभवानी हौसिंग सोसायटी येथील रहिवासी आमचे मार्गदर्शक सोलापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड इंजिनिअर व नामवंत बँकेचे मूल्यांकन करणारे राजेश हलकुडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून माणुसकी फाऊंडेशन सोलापूर च्या माणुसकीची ऊब ह्या उपक्रमात सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना ब्लँकेट असे योगदान दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले.
सध्या थंडीची लाट असल्यासारखे वाटत आहे अश्या दिवसांमध्ये रस्त्यावरच्या लोकांचे काय होत असेल हा विचार करून हे योगदान दिल्याचे सांगितले. सदर प्राप्त ब्लँकेटस हे १६ डिसेंबर रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत गरजुंच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून म्हणून घालण्यात येणार आहे.
राजेश हलकुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या माणुसकीच्या ऊब चे कौतुक करून नागरिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.