मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय या संस्थेच्या धर्मादाय न्यास नोंदणी कार्यालयाकडे बदल अहवाल सादर करताना ऍड रमेश जोशी, डॉ अशोक सुरवसे यांच्या खोट्या सह्या करून खऱ्या असल्याच्या भासविले प्रकरणी राहुल शहा, शुभदा शहा ,किसन गवळी, बाबासाहेब पाटील यांच्यावर 420, 468 ,467, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. राहुल शहा यांना 4 जानेवारीपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राहुल शहा 18 ते 20 डिसेंबर या काळात रोज सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहून पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत . 30 हजार रुपयाचे जतमुचलक्या वर अटक होऊन जामीन करुन घेण्यास सांगीतले आहे.
अर्जदार फिर्यादी यांना दमदाटी धमकी वगैरे असे प्रकार करू नयेत असे देखील हायकोर्टाच्या आदेशात म्हटले आहे.
याप्रमाणे सोमवारी सकाळी दहा वाजता पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत .तपास अधिकाऱ्यासमोर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडाली असल्याचे समजते. संस्थापक सर्वसाधारण च्या यादीमध्ये राहुल शहा यांचे नाव सभासद म्हणून आले असल्याचे समजले आहे यामुळे संस्थेच्या सभासदासह शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे .यापूर्वी राहुल शहा या संस्थेचे समन्वयक म्हणून घेत होते काम देखील करत होते महाविद्यालयाच्या सुकृत या वार्षिक पुस्तकांमध्ये शहा यांचा संस्था समन्वयक म्हणून, मार्गदर्शक म्हणून फोटो देखील आहे .महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय मूल्यांकन तपासणीमध्ये देखील ते उपस्थित होते. दरम्यान सलग तीन दिवस पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जाणार असल्यामुळे त्यांच्या हितचिंतकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या 80 टक्के पेक्षा अधिक सभासदांच्या बोगस सह्या केल्या असल्याची तक्रार धर्मादाय कार्यालय सोलापूर यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आलेले आहे. दरम्यान रमेश जोशी, अशोक सुरवसे यांनी शासनमान्य अधिकृत एजन्सी कडून त्यांच्या स्वाक्षरी तपासून आणलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शहा यांना तात्पुरता जामीन देताना धर्मादाय आयुक्त कडे असलेले रेकॉर्ड तपासण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत . पुरावा मध्ये छेडछाड करू नये .असे सांगीतले आहे.
संस्थेचा पत्रव्यवहार ,मूळ स्वरूपातील व इतर कागदपत्र हे झेरॉक्स स्वरूपात धर्मादाय आयुक्तकडे संस्थेने पाठवलेले आहे. संस्थेची मूळ सर्व कागदपत्रे, इतिवृत्त पुस्तिका ही संस्थेचे अध्यक्ष ,सचिव ,उपाध्यक्ष यांच्याच ताब्यात असल्याचे संस्थेच्या सभासदांकडून सांगितले जात आहे. रमेश जोशी यांनी यापूर्वी एका लेखी पत्राद्वारे प्राचार्य डॉ. एन बी पवार यांना लेखी पत्र देऊन संस्थेचे दप्तर संस्थेच्या कार्यालयात आणावे राहुलच्या यांच्या घरी ठेवू नये असे स्पष्ट लेखी तक्रारीत कळवलेले आहे त्यावर जोशी यांनी पवार यांची पोच देखील घेतलेली आहे आता या प्रकरणात पोलीस तपासात आणखी काय काय सापडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.