माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
दिनांक १८/१२/२०२३ रोजी वेळापूर पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार असे सरकारी वाहनाने गस्त करीत असताना वेळापूर येथील इसम नामे चिक्या उर्फ सुमित संजय साखरे हा गावठी पिस्टल बाळगून तलाठी कार्यालय जवळ मोटार सायकल वरून येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टाप तलाठी कार्यालय येथे पोहोचले असता समोरून चिक्या उर्फ सुमित साखरे रा. वेळापूर हा मोटार सायकल वरून येत असल्याचे पोलीस स्टाप यांना दिसले त्याचा पोलीसांना बातमीप्रमाणे संशय आल्याने चारचाकी वाहनातून पोलीस खाली उतरून चिक्या उर्फ सुमित संजय साखरे यांस थांबविले.
त्यावेळी चिक्या उर्फ सुमित साखरे हा गाडीवरून खाली उतरून पोटाच्या खालील बाजूस जीन पॅन्टमध्ये खोवलेली एक पिस्टल बाहेर काढले त्यावेळी पोलीस स्टापने तात्काळ गराडा घालून चिक्या उर्फ सुमित संजय साखरे यास पकडून त्याचेजवळील गावठी पिस्टल सपोनि/श्री. निलेश बागाव यांनी ताब्यात घेतले ती वेळ दुपारी १२/३० वाची होती. चिक्या उर्फ सुमित संजय साखरे रा. वेळापूर यांचे ताब्यातून एक गावठी पिस्टल एक जिवंत काडतुस तसेच एक एच. एफ. डिलक्स मोटार सायकल जप्त करून त्यास पोलीस ठाणेत आणून गु.र.नं ३२८/२०२३ भा.द.वि. भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
नमूद गुन्हयात आरोपी नामे चिक्या उर्फ सुमित संजय साखरे यास अटक केली असून गुन्हयाचा तपास स.पो.नि/निलेश बागाव हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग अकलुज डॉ. सई भोरे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक संजय राउत, पोलीस हवालदार यशवंत आनंदपुरे, बापू पवार, पठाण व गणेश माळी यांनी बजावली आहे.