सोलापूर प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातील आरमान बालाजी शिंदे यांनी बॉक्सिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला.विद्यार्थांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्याचा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी महाविद्यालयात नेहमीच प्रयत्न केला जातो, तसेच महविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम करत असतात. ही स्पर्धा के.एन.भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथे पार पडली.
आरमान शिंदे याच्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रविंद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, स्पोर्ट्स विभागप्रमुख डॉ.करीम मुजावर, डॉ.दत्तात्रय गंधमल, डॉ. प्रदिप तपकिरे, डॉ.विजयकुमार बिरादार, डॉ. विनोद खरात तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.