सोलापूर प्रतिनिधी
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य लिं.श्री.ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ७६ व श्री सिद्धांत शिखामणी श्लोक पाठांतर स्पर्धेत ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सहा गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रथम तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार व शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.परिक्षक म्हणून आनंद बावधनकर, रामचंद्र धर्मसाले, संतोष मनगोंडे,सागर देशमाने, मिनाक्षी शेटे आदींनी काम पाहिले.
यावेळी पुणे विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार म्हणाले, अभ्यासपूर्ण भाषण करण्यासाठी व उत्तम वक्ता होण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे. वक्तृत्व स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. समोर येऊन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी धैर्य लागते.विचारांची मांडणी करावी लागते असे विद्यार्थी भविष्यात उत्तम वक्ते होतात असे ते म्हणाले. शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी म्हणाले, नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार सर यांनी परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे अध्यात्मिक विचार, पूजा पाठ, गुरुंचे चिंतन पुढच्या पिढीला अशा धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देत आहेत.त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवानंद पुजारी,मारुतीराव कांबळे,अंगद तोरणे, राजकुमार मरगूरे, काशिनाथ माळगोंडे,षडाक्षरी हिरेमठ, जयश्री स्वामी,शितल पाटील, बसवराज बिराजदार,सुनीता पवार, भारती पाटील, नरेश नराल आदींनी परिश्रम घेतले.