बीड प्रतिनिधी
अखिल भारतीय नामदेव क्षेत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्याची घुमान येथे पुढील वर्षी 2 व 3/3 /2024 मार्चला होणाऱ्या अधिवेशन साठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.
त्या मिटिंग ला महा. राज्य व बाजुच्या मध्य प्रदेश मधील समाज बंधू उपस्थित होते. बरेच विषया वर चर्चा झाली व त्यानंतर अशोक दादा यांची बीड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. त्यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी अशोक दादा चा सत्कार अखिल भारतीय नामदेव क्षेत्रिय महा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर यांनी केला.
त्यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षेत्रिय युवा संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष भोपल येथील विवेक नामदेव, सचिव महादेवराव खटावकर,सह सचिव कैलास धोकटे,श्री प्रेस युनियन व नामदेव समाज उन्नती परिषदचे बाळासाहेब व गनबावले काका उपस्थित होते. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख संतोष मुळे यांनी दिली.